Google Assistant वर मुलांकरिता असलेल्या वैशिष्ट्यांमधून ऑडिओ संग्रहित करण्यासंबंधित गोपनीयतेची सूचना
कुटुंबासाठी Assistant कृती किंवा YouTube Kids व्हिडिओ यांसारखी मुलांसाठी असलेली वैशिष्ट्ये लोक Google Assistant द्वारे वापरतात तेव्हा, आम्ही व्हॉइस आणि ऑडिओ माहिती कशी गोळा करतो हे समजून घेण्यात आम्हाला पालकांना मदत करायची आहे. Google गोपनीयता धोरण मध्ये पुरवलेल्या माहितीव्यतिरिक्त Google Assistant वरील या वैशिष्ट्यांच्या वापरावरदेखील ही गोपनीयतेची सूचना लागू होते.
त्यांच्या देशामधील लागू असलेल्या वयोगटातील ज्या लहान मुलांच्या पालकांनी त्यांचे Google खाते हे Family Link वापरून तयार केले आहे, ती लहान मुले Google Assistant ने युक्त बहुतांश डिव्हाइसवर त्यांची खाती लिंक करू शकतात. तुम्ही Assistant शी संवाद साधण्यासाठी तुमचा आवाज वापरता तेव्हा व्हॉइस व ऑडिओ रेकॉर्डिंग तुमच्या Google खाते मध्ये स्टोअर केली जातात की नाहीत, हे वेब आणि अॅप अॅक्टिव्हिटी सेटिंगच्या अंतर्गत असलेल्या "ऑडिओ रेकॉर्डिंगचा समावेश करा" या पर्यायाद्वारे नियंत्रित केले जाते. Google खाते तयार करताना हा पर्याय बाय डीफॉल्ट बंद असतो आणि Assistant वापरण्यासाठी त्याची आवश्यकता नाही. तुमच्या लहान मुलाच्या वेब आणि अॅप अॅक्टिव्हिटी सेटिंगच्या अंतर्गत असलेला "ऑडिओ रेकॉर्डिंगचा समावेश करा" हा पर्याय निवडलेला असल्यास, ते साइन-इन केलेल्या डिव्हाइसवर Assistant शी संवाद साधतात तेव्हा त्यांच्या संवादाचे रेकॉर्डिंग तसेच त्याआधीची काही सेकंद कदाचित त्यांच्या खात्यावर स्टोअर केली जाऊ शकतात.
तुम्ही Family Link वापरून तुमच्या लहान मुलासाठी नवीन खाते तयार केले असल्यास, तुम्ही त्यांच्या Google खात्यामध्ये साइन इन करून तुमच्या लहान मुलाची ऑडिओ रेकॉर्डिंग अॅक्सेस करू शकता, अपडेट करू शकता, काढून टाकू शकता आणि एक्सपोर्ट करू शकता. तुम्हाला तुमच्या लहान मुलाचा पासवर्ड आठवत नसल्यास, तुम्ही तो Family Link अॅपमधून किंवा वेबवरील Family Link सेटिंग्ज मधून रीसेट करू शकता. साइन इन केल्यानंतर, Google गोपनीयता धोरण मध्ये वर्णन केलेली विविध नियंत्रणे (जसे की, Google अॅक्टिव्हिटी कंट्रोल) ही तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या खात्यामध्ये स्टोअर केलेली अॅक्टिव्हिटी हटवण्याच्या समावेशासह त्यांची ऑडिओ रेकॉर्डिंग सेटिंग्ज आणि त्यांचे खाते वापरून स्टोअर केलेली ऑडिओ रेकॉर्डिंग व्यवस्थापित करण्यासाठी वापरू शकता.
तुमच्या देशातील किमान आवश्यक वयाशी संबंधित तरतुदींमध्ये बदल होण्याआधी तुमच्या लहान मुलाने स्वत:चे खाते तयार केले असल्यास आणि तुम्ही नंतर त्यांना त्यांचे खाते सुरू ठेवण्याची परवानगी दिली असल्यास, त्यांच्या खात्याचा पासवर्ड रीसेट करण्यासाठी किंवा त्यांच्या खात्यामध्ये साइन इन करण्यासाठी तुम्हाला कदाचित तुमच्या लहान मुलाची परवानगी लागेल.
ऑडिओ रेकॉर्डिंगचा समावेश करण्याची निवड केली आहे अशी Family Link वापरून व्यवस्थापित केलेल्या Google खाते शिवाय तुम्ही लहान मुलांसाठी Google Assistant वर असलेल्या कुटुंबासाठी Assistant कृती किंवा YouTube Kids व्हिडिओ यांसारख्या वैशिष्ट्यांशी संवाद साधल्यास, आम्ही त्या संवादांची व्हॉइस आणि ऑडिओ रेकॉर्डिंग फक्त थोडक्यात गोळा करू. आम्ही ऑडिओ वैशिष्ट्य वापरण्याची अनुमती देण्यासाठी या माहितीवर प्रक्रिया करताे जेणेकरून, आम्ही हा संवाद पूर्ण करू शकू आणि तात्काळ हटवू शकू.
शेवटचे फेरबदल केले: २ सप्टेंबर २०२१